“देवों के देव महादेव” – टीव्ही सिरीयल अभिनेत्री प्रितीकाला गांजा खरेदी करतांना अटक

On: October 26, 2020 4:56 PM

मुंबई : बॉलीवूडचा मोठा पडदा आणि टी.व्ही.च्या छोट्या पडद्यावरील बहुतेक अभिनेत्री आता अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या रडारवर आल्या आहेत. “देवो के देव महादेव” या धार्मिक टी.व्ही. मालिकेत काम करणा-या अभिनेत्रीला गांजा खरेदी करतांना एनसीबी ने रंगेहाथ पकडले आहे. तिच्या अटकेमुळे अनेक कलाकारांची नाव मोठ्या प्रमाणात पुढे येण्याची शक्यता बळावली आहे.

अनेक टी.व्ही. मालिकांमध्ये प्रीतिका चौहान या अभिनेत्रीने देवीची भूमिका केली आहे. पडद्यावर देवीची भुमिका साकारणारी अभिनेत्री प्रत्यक्ष जीवनात मात्र गांजा खरेदी करते हे जरा विचीत्र वाटते.

प्रीतिकाने ‘देवों के देव महादेव’ या लोकप्रिय मालिके सह “सीआयडी” आणि “सावधान इंडिया” या सारख्या प्रसिद्ध सीरियलमध्ये अभिनय केला आहे. आता प्रीतिकाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अंमली पदार्थ विकत घेताना रेड हॅंड पकडल्याने खळबळ माजली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment