लोणावळ्यात माजी शिवसेना शहरप्रमुखाची सकाळी हत्या

On: October 26, 2020 5:42 PM

लोणावळा : लोणावळा येथील शिवसेना माजी शहरप्रमुख व शिवसेना संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांचे सुपुत्र राहुल उमेश शेट्टी यांची आज पहाटे साडे नऊ वाजता त्यांच्या राहत्या घरासमोर जयचंद चौकात हत्या करण्यात आली.

राहुल शेट्टी यांच्या डोक्यावर, मानेवर धारदार शस्त्रांनी वार तसेच तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. त्यांना तातडीने लोणावळा येथील परमार रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शेट्टी यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी एक प्रत्यक्षदर्शी असून कसून तपास सुरु आहे. परमार हॉस्पीटलच्या बाहेर त्यांच्य समर्थकांनी गर्दी केली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment