जळगाव: बंदुकीच्या धाकावर जबरीने महागडा मोबाईल हिसकावून नेणा-या फरार आरोपीस ताब्यात घेण्यात मध्यरात्री भुसावळ बाजारपेठ पोलिसांना यश आले.
याबाबत वृत्त असे की भुसावळ शहरातील शनी मंदीर वार्ड परिसरातील रहिवासी राजेश रमाशंकर दुबे हे 21 जून रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आपल्या घराच्या ओट्यावर बसले होते. त्यावेळी बाबा काल्या व रईस व इतर दोन इसम तेथे आले. बाबा काल्या याने राजेश दुबे यांना सिगारेट मागण्याच्या कारणावरुन वाद घालत कमरेला खोचलेली बंदुक काढली. त्या बंदुकीचा धाक दाखवून बाबा काल्यसह इतरांनी राजेश दुबे यांचा मोबाईल हिसकावून घेत शिवीगाळ करत धमाकावून पळ काढला होता. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात राजेश दुबे यांच्या फिर्यादीनुसार भाग 5 गु.र. न. 0667/2020 भा.द.वि. कलम 394, 323, 504, 506, 34 तसेच आर्म अॅक्ट कलम 3/25 नुसार 22 जून रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून सर्व आरोपी फरार होते.
फरार आरोपी आशिक उर्फ बाबा काल्या असलम बेग (22) रा.अयान कॉलनी भुसावळ, शेख रहीस शेख नईम (19) रा.पंचशील नगर भुसावळ हे दोघे आरोपी भुसावळ शहरात फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन त्यांना घोडेपीर बाबा भागातून ताब्यात घेण्यात आले.
उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, अनिल मोरे, पो.ना. किशोर महाजन, समाधान पाटील, रविंद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर, महेश चौधरी, तुषार पाटील, उमाकांत पाटील, पो.कॉ. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, श्रीकृष्ण देखमुख, प्रशांत परदेशी यांनी सदर कारवाई केली.