गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई यांनी घेतला अखेरचा श्वास

On: October 29, 2020 3:01 PM

अहमदाबाद : गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे आज निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ९२ वर्षांचे होते. गुरुवारी सकाळी केशुभाई पटेल यांना श्वास घेण्यास मोठ्या प्रमाणात त्रास सुरु झाला. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केशुभाई पटेल यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर मात देखील केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विविध नेत्यांनी केशुभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment