जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या तपास पथकाने दोघा दुचाकीचोरांना त्यांनी चोरलेल्या दोन दुचाकींसह ताब्यात घेतले आहे. भिकन देवा कानोडे (21), रा.भारत नगर यास त्याच्या सतरा वर्षाचा अल्पवयीन साथीदारासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
21 ऑक्टोबरच्या दुपारी दोन वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील आई हॉस्पिटल परिसरातून अॅक्टीव्हा दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणी रमजान हमीदउल्ला शेख (55), यांच्या फिर्यादीनुसार 24 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पो.नि. दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी आपल्या पथकाच्या मदतीने आरोपी भिकन कानोडे व त्याचा अल्पवयीन साथीदार अशा दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. चौकशीअंती त्यांनी चोरलेल्या दोन दुचाकी काढुन दिल्या आहेत. त्यात 20 हजार रुपये किंमतीची अॅक्टीव्हा आणि 35 हजार रुपये किंमतीच्या दुस-या अॅक्टीव्हा वाहनाचा समावेश आहे.
बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पो.नि. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. अनिल मोरे, मंगेश गोंटला, एएसआय तस्लिम पठाण, हवालदार इरफान काझी, अयाज सैय्यद, नाईक रवींद्र बि-हाडे, किशोर महाजन, रमण सुरळकर, निलेश बाविस्कर, दीपक जाधव, उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख, चेतन ढाकणे, योगेश महाजन, सुभाष साबळे, सचिन चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई पुर्ण केली आहे.