पो.नि.किसनराव नजनपाटील पुन्हा येणार जिल्ह्यात

On: November 1, 2020 8:37 AM

जळगाव : डॅशींग पोलिस अधिकारी म्हणून परिचीत असलेले किसनराव नजनपाटील हे पुन्हा जळगाव जिल्ह्यात येत आहेत. सध्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिस स्टेशनचे प्रभारी असलेले पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या बदलीचे आदेश झाले असून त्यांची बदली जळगाव जिल्ह्यात झाली आहे.

ते लवकरच येत्या दोन दिवसात जिल्ह्यात हजर होण्याची शक्यता आहे. क्राईमदुनिया सोबत बोलतांना पोलिस निरिक्षक किसनराव नजनपाटील यांनी माहिती दिली आहे.

त्यांना जिल्ह्यात कोणते पोलिस स्टेशन दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. एक डॅशींग अधिकारी म्हणून नजनपाटील हे जिल्ह्याला सुपरिचीत आहेत. यापुर्वी त्यांनी जळगाव शहर, भुसावळ बाजारपेठ तसेच चोपडा शहर येथे काम केलेले आहे.

चोपडा येथे कार्यरत असतांना राजकीय कार्यकर्त्यासोबत झालेल्या वादामुळे त्यांची बदली करण्यात आली होती. त्यांची बदली रद्द होण्यासाठी त्यावेळी चोपडा शहरवासीयांनी आंदोलन देखील केले होते. त्यावरुन त्यांची लोकप्रियता लक्षात येते. अन्यायाची चिड असलेल्या पो.नि. किसनराव नजन पाटील यांना आता कोणते पोलिस स्टेशन मिळते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment