अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्यावर येणार चरित्रपट

जेष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल यांनी आपल्या जीवनात आजवरील तिस 30 वर्षाच्या वकीली क्षेत्रात 628 आरोपींना जन्मठेप व 37 आरोपींना फाशीची शिक्षा मिळवून दिली आहे.
चरित्रपट अर्थात बायोपिकची चलती असलेल्या काळात आणखी एक बायोपिक प्रेक्षकांसाठी येत आहे. अजमल कसाब सारख्या क्रूरकर्म्याला फाशीची शिक्षा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्यावरील चरित्रपट लवकरच झळकणार आहे.

दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी याबाबत नुकतीच घोषणा केली आहे. उमेश शुक्ला यांनी यापुर्वी ‘ओएमजी-ओह माय गॉड’, ‘102 नॉट आऊट’ या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे.
अ‍ॅड. उज्वल निकम यांच्यावरील चित्रपटाची पटकथा तयार झालेली आहे. सिनेमाची स्टारकास्ट तेवढी ठरायची बाकी आहे. अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची भूमिका पडद्यावर कोण साकारणार याची मात्र उत्सुकता निर्माण झाली आहे.

अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या या चरित्रपटाचे नाव ‘निकम’ असे राहील. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक भावेश मंडालिया तसेच गौरव शुक्ला यांनी या चित्रपटाच्या पटकथेचे लेखन केले आहे. आगामी वर्षात या सिनेमाचे चित्रीकरण होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here