पूनम पांडेच्या व्हिडीओमुळे पोलीस निरीक्षकासह पाच कर्मचारी निलंबित

मडगाव : काणकोण येथील पाटबंधारे खात्याच्या चापोली धरणावर कायम चर्चेत राहणारी हॉट मॉडेल पूनम पांडे हिने शूट केलेला पॉर्न व्हिडिओ पोलिसांना त्रासदायक ठरला आहे. पॉर्न व्हिडीओ शूट होत असतांना पुनमला संरक्षण दिल्याचा आरोप झाल्याने काणकोणचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्यासह पाच जण निलंबित करण्यात आले आहे.

काणकोण पोलीस स्टेशनला पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे या पती पत्नी विरुद्ध अश्लील व्हिडीओ शूट करणे तसेच सरकारी मालमत्तेत घुसखोरी करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही चौकशीकामी बोलावले जाणार असल्याचे पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी म्हटले आहे.

गेल्या शनिवारी हा सॉफ्ट पॉर्न व्हिडीओची शूटिंग करण्यात आली होती. त्यावेळी पूनम आणि तिचा पती सॅम असे दोघे स्पॉटवर हजर होते. पुनमचा हा पॉर्न व्हिडीओ तिचा पती सॅमने शूट केला होता. व्हिडीओ शूट करताना तेथे दोन साध्या वेषातील पोलीस तैनात होते. त्या दोघांना देखील निलंबित करण्यात आले आहे.

धरणावर पहाऱ्यासाठी त्या दिवशी हजर असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांना देखील निलंबित करण्यात आले आहे.पो लिसांना निलंबित करण्याची मागणी काणकोणच्या नागरिकांनी केली होती.तसेच गुरुवारी बंदची हाक देखील दिली होती. संबंधित पोलिसांना निलंबित केल्याने हा बंद मागे घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here