रायगड : वास्तुरचनाकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी अटकेतील रिपब्लिक वृत्त वाहिनीचे संपादक अर्णब गाेस्वामी यांच्यासह नितेश सारडा, फिराेज शेख यांना १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली आहे.त्या कोठडीला आव्हान देणारा अर्ज रायगड पाेलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला असून त्या अर्जावर शनिवारी सुनावणी हाेणार आहे.
अर्णब गाेस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी हाेणार असल्यामुळे गाेस्वामी यांना न्यायालयीन काेठडीतच राहण्याची वेळ येणार असल्याचे दिसते.काेविडमुळे अलिबाग न.पा.च्या मराठी शाळेत उपकारागृह तयार केले असून तेथेच अर्णब गाेस्वामी, शेख आणि सारडा यांना ठेवले आहे. याच ठिकाणी विविध गुन्ह्यांतील ४२ आराेपी देखील आहेत.
शेख आणि सारडा यांच्याb दाखल जामिन अर्जावर शनिवारी सुनावणी होईल.विधानसभेच्या विशेषाधिकार समितीसमोर हजर होण्याचे आदेश अर्णब गोस्वामी यांना देण्यात आले होते. त्याकडे त्यांनी पाठ फिरवली आहे. सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे की गोस्वामी यांना अनेक वेळा विधानभवनाने नोटीस पाठवली असून त्यांनी एकही नोटीसचे उत्तर अद्याव दिलेले नाही.