तेलात भेसळ असल्याच्या संशयातून घेतले नमुने

जळगाव : विक्री होत असलेल्या तेलात भेसळ असल्याच्या संशयातून चाळीसगाव येथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने तेल व तेलाचे नमुने तपासणीकामी घेतले आहेत.

दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर खाद्य तेलाची वाढती मागणी लक्षात घेता भेसळ होण्याची शक्यता गृहीत धरुन अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासणीला सुरुवात केली आहे. तपासणीचा भाग म्हणून या विभागाच्या पथकाने चाळीसगाव येथील राजकुमार अग्रवाल यांच्या दुकानातून तेल व तेलाचे नमुने ताब्यात घेतले आहेत.

जवळपास 3 लाख 93 हजार 310 रुपये किंमतीचे तेल अन्न व औषध विभागाने ताब्यात घेतले आहे. अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील व त्यांच्या पथकाने रीफाईंड सोयाबीन तेलाचे नमूने घेतले आहे.

नागरीकांनी मिठाई घेताना व्यवस्थीत पारखून घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त बेंडकुळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here