बोदवड येथे महिलेची आत्महत्या

On: November 8, 2020 6:11 PM

जळगाव : बोदवड येथील जुन्या पोस्ट गल्लीतील रहिवासी असलेल्या अनिता रमेश पाटील (३८) या विवाहीत महिलेने भुसावळ रस्त्यावरील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. सदर घटना रविवारी सकाळी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

अनिता पाटील या महिलेने आत्महत्या का केली याचे नेमके कारण समजू शकले नाही. आली. सदर महिलेला १८ वर्षीय मुलगा तर १६ वर्षाची मुलगी आहे. आत्महत्या करणारी महिला गेल्या काही दिवसापासून चिंताग्रस्त असल्याचे चर्चेतून समजते. बोदवड पोलीस स्टेशनला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment