राजकोट – गुजरातच्या राजकोट येथील आठवीत शिकणाऱ्या बारा वर्षाच्या विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळकरी विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लास आणि होमवर्कचा ताण वाढला आहे. त्यामुळे कित्येक विद्यार्थांना नैराश्य आले. आहे. ऑनलाईन अभ्यासामुळे डोळ्यांवर देखील ताण वाढत असून पाठीचे दुखणे वाढले आहे. आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्या करणा-या विद्यार्थीनीच्या वडीलांचे गॅरेज असून त्यांनी तिला ऑनलाईन अभ्यासासाठी दहा हजार रुपयांचा स्मार्टफोन घेऊन दिला होता. मुलीच्या आईने तिला अभ्यास करण्यासाठी सांगीतले होते. यावेळी तिने आपल्याला अंघोळीला जाण्याचे कारण सांगत खोलीत जावून थेट गळफास घेत आपली जिवनयात्राच संपवली.