तरुणीवर सामुहिक बलात्कारासह विष पाजल्याचा आरोप

On: November 10, 2020 2:41 PM

जळगाव : जिल्ह्यातील पारोळा येथील एका विस वर्षाच्या तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कारानंतर तिला विष पाजून ठार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेतील तरुणीचा मृत्यू झाला असून गुन्हा दाखल करण्याचे काम पारोळा पोलिस स्टेशनला सुरु असल्याचे वृत्त आहे.

काही दिवसांपूर्वी पारोळा येथील एक तरुणी बेपत्ता झाली होती. त्यामुळे तिची मिसींग दाखल करण्यात आली होती. त्यानंतर दुस-याच दिवशी ती बेशुद्ध अवस्थेत पारोळा बस स्टॅंड परिसरात नातेवाईकांना आढळून आली.

नातेवाईकांनी वैद्यकीय उपचारार्थ तिला धुळे येथील रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरु असतांना आज तिचा मृत्यू झाला. दरम्यान तिच्यावर सामुहिक बलात्कार व नंतर तिला विष पाजुन ठार केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.

या प्रकरणी पिडीत व मयत तरुणीच्या नातेवाईकांनी पारोळा पोलिस स्टेशनला धाव घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मयत तरुणीचे नातेवाईक गुन्हा दाखल करण्याकामी पारोळा पोलिस स्टेशनला आलेले होते. दरम्यान या घटनेने पारोळा परिसरात खळबळ माजली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment