दुचाकी चोरणारी टोळी एलसीबीकडून जेरबंद

On: November 11, 2020 9:56 PM

जळगाव : जिल्ह्यातील विविध भागातून चोरलेल्या दुचाकींचे स्पेअर पार्ट्स विक्री करणा-या टोळीचा एलसीबीने छडा लावला आहे. एलसीबी पथकाने या टोळीला अटक करण्यात यश मिळवले आहे. जवळपास 2 लाख 52 हजार रुपये किमतीच्या चोरी केलेल्या नऊ दुचाकी पथकाने जप्त केल्या आहेत.

एलसीबीचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ. संजय हिवरकर, राजेश मेढे, रवी नरवाडे, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, अविनाश देवरे, महेश महाजन यांनी ही कारवाई केली.

शाहरुख सलीम खान, अमन सय्यद रशीद व इमराज रमजान पटेल असे अटकेतील तिघा संशयीत आरोपींची नावे आहेत. हे तिघे जण शहरातील विविध भागातून दुचाकी चोरुन त्याचे स्पेअर पार्टस विक्री करत होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment