जळगावात विवाहितेचे अश्लील व्हिडीओ चित्रण – गुन्हा दाखल

On: November 27, 2020 4:43 PM

जळगाव : विवाहीतेशी जवळीक साधून तिला लॉजवर नेवून अत्याचार तसेच अश्लिल व्हिडीओ चित्रण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय उर्फ विक्की संजय ठाकूर असे संशयीत आरोपीचे नाव आहे. मंगळवारी रात्री दाखल झालेल्या गुन्ह्यातील विजय ठाकुर (द्वारका नगर – शिवधाम अपार्टमेंट जळगाव) या संशयीतास आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पीडित महिला कंपनीत नोकरीला असून तिला नोकरीच्या जागी ये – जा करण्यासाठी सुरुवातीच्या काळात वाहनाची व्यवस्था करुन देण्यात आली होती. कालांतराने त्या वाहनाची व्यवस्था बंद करण्यात आली. त्यामुळे तिच्यासह एकुण तेरा महिलांनी मिळून वियय ठाकूर याचे चारचाकी वाहन भाड्याने लावले.

या कालावधीत पिडीत महिला विजय ठाकूर याच्या मनात भरली. त्याने तिला त्याच्या मैत्रीणीच्या माध्यमातून प्रेमाचा निरोप पाठवला. काही दिवसांनी त्या मैत्रीणीने तिला म्हटले की विजयसह आपल्या तिघांना बाजारात जायचे आहे. त्यावेळी बाजारात जाण्याएवजी विजयने त्यांना रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉजजवळ रिक्षाने नेले.त्याठिकाणी ती मैत्रीण बाहेरच थांबली व विजय पिडीत विवाहीतेला लॉजवर घेवून गेला. त्याठिकाणी त्याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच त्या कृत्याचे फोटो काढले तसेच चित्रीकरण केले. त्यानंतर दोघींना त्याने घरी सोडून दिले. पिडीतेने तिच्य मैत्रीणीला हा प्रकार कथन केला असता ती मैत्रीण म्हणाली की तो तुझ्यावर प्रेम करतो.

काही दिवसांनी त्याने त्या विवाहितेसोबत पुन्हा त्या लॉजमधे नेवून तोच प्रकार केला. तसेच फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला. काही दिवसांनी विजय याने तिला त्या प्रसंगाचा व्हिडीओ तिच्या मोबाईलवर पाठवून चॅट केले. त्या व्हिडीओच्या बळावर तो तिला कारमधून मोहाडी व शिरसोली परिसरात घेवून गेला. यावेळी त्याने तिच्यावर चारचाकीत अत्याचार केले. अखेर तिने एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दाखल केली. या प्रकरणी तपास अधिकारी गणेश पाटील यांनी संशयीत विजय संजय ठाकूर याला अटक केली. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलिस कोठडी सुनावली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment