मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामी यांची सर्वोच्च न्यायालयाकडून जामिनावर मुक्तता झाली आहे. दरम्यान न्यायालयीन कोठडीत असतांना त्यांना वापरण्यास दिलेला मोबाईल दोन पोलिस कर्मचा-यांना चांगलाच महागात पडला आहे. या दोघा पोलिस कर्मचा-यांना नोकरीतून निलंबित होण्याची वेळ आली आहे.
अर्णब गोस्वामी यांची रवानगी अलिबागच्या शाळेतील तात्पुरत्या तुरुंगात करण्यात आली होती. त्याठिकाणी गोस्वामी हे मोबाईलच्या माध्यमातून सोशल मिडीयावर सक्रिय होते.
या प्रकाराची गांभिर्याने दखल घेत कारागृह प्रशासनाने खातेनिहाय चौकशी सुरू केली. तुरुंगातील इतर कैद्यांची देखील चौकशी करण्यात आली होती.
या चौकशीदम्यान दोघे पोलीस कर्मचारी हे पैशांच्या मोबदल्यात कैद्यांना स्वत:चा मोबाईल वापरण्यास देत होते अशी माहिती पुढे आली.सुभेदार अनंत भेरे व पोलीस शिपाई सचिन वाडे अशी त्यांची नावे असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.