दरोडेखोरांची टोळी धुळे पोलिसांच्या ताब्यात,पो.नि. हेमंत पाटील यांची प्रभावी कामगिरी

आरोपी समवेत पोलिस तपास पथक

hemant-patil-PI

धुळे: धुळे शहरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या व पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या चोरट्याने मनमाड येथे दोन गावठी पिस्टल विक्री केल्याची कबुली धुळे शहर पोलिसांना दिली होती. त्या माहितीच्या आधारे धुळे शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने मनमाड येथून दोघा सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात यश मिळवले. त्यांच्याकडून साठ हजार रुपये किमतीचे दोन पिस्टल व चार जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. या दोघांना अटक करुन दरोडेखोरांच्या टोळीला ताब्यात घेण्यात शहर पोलिसांनी यश मिळवले. या कामगिरीमुळे पो.नि.हेमंत पाटील कौतुकास्पद पात्र ठरले. 

नाशिक शहरातून तडीपार असलेला सराईत गुन्हेगार विजय उर्फ छ्ंगा सरजीत बेंडवाल रा. जयभवानी रोड, फर्नांडीस वाडी, नाशिक याला शहर पोलिसांनी दोन दिवसांपुर्वी साक्री रस्त्यारुन अटक केली होती. साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकण्याच्या इराद्याने बेंडवाल धुळे शहरात दाखल झाला होता. त्यावेळी त्याला संशयास्पद स्थितीत धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून दोन पिस्टल व चार जिवंत काडतुस, कार व अन्य साहित्य जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी बेंडवाल सह साक्षीदारांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर पो.नि. हेमंत पाटील यांनी बेंडवाल याची सखोल चौकशी केली असता त्याने मनमाड येथील दोघा गुन्हेगारांना गावठी पिस्टल विक्री केल्याची कबुली दिली होती. त्या आधारे स.पो.नि. संतोष तिगोटे व सहका-यांनी मनमाड गाठले. मनमाड येथून पवन देवकते (मनमाड), ललित मोतीयानी( मनमाड), या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून दोन गावठी पिस्टल व चार जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. क्रमाक्रमाने एकुण सात संशयीत आरोपी ताब्यात घेण्यात आले.

पोलिस अधिक्षक चिन्म्य पंडीत, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. राजू भुजबळ , उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. हेमंत पाटील, स.पो.नि. संतोष तिगोटे व शोध पथकाच्या कर्मचारी वर्गाने कारवाई केली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here