शिर्डी : राज्यातील मंदिरांसह सर्वच धार्मिक स्थळे सोमवारपासून खुली होणार आहेत. धार्मिक स्थळांशी संबंधीत अर्थकारणाला आता चालना मिळणार आहे. गेल्या 17 मार्चपासून बंद असलेल्या शिर्डीच्या साईबाबांचे खुले दर्शन केवळ स्थानिक भाविक ग्रामस्थांना होणार आहे. बाहेरगावच्या भाविकांना दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करावे लागणार आहे.
सुरुवातीला दररोज केवळ सहा हजार भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. केवळ ऑनलाईन बुकींग असेल तरच साईबाबांच्य दर्शनासाठी बाहेरगावच्या भाविकांनी शिर्डीत यावे असे संस्थानकडून कळवण्यात आले आहे.
भाविकांना सुलभ दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. सोमवारपासून दर्शनासाठी परवानगी देण्यात येणार असल्याने साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नियमांचे पालन करत भाविकांसाठी हे मंदिर खुलं करण्यात येत आहे. आपली गैरसोय होणार नाही याची भाविकांनी काळजी घ्यावी, असंही आवाहन करण्यात आलं आहे.