मडगाव : लॉकडाऊन काळात लग्न उरकून गोव्यात आलेली हॉट मॉडेल पूनम पांडे सतत चर्चेत रहात गोवा येथील वास्तव्यात पूनम सहा आठवड्याची गरोदर असल्याचे तिला तपासणा-या डॉक्टरांनी म्हटले आहे. दरम्यान वादग्रस्त शुटींगमुळे पुन्हा चर्चेत आलेली पूनम आणि तिचा पती सॅम बॉम्बे या दोघांनी मुंबईला जाण्यासाठी काणकोण न्यायालयाकडे मागितलेली परवानगी मान्य करण्यात आली.
काणकोण येथील धरणावर ‘तो’ वादग्रस्त पॉर्न व्हिडीओ शूट केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तिच्यासह तिच्या पतीला जामीन देताना काणकोण न्यायालयाने सहा दिवस काणकोण पोलीस स्टेशनला हजेरीची अट घातली होती. तसेच गोवा सोडून राज्याबाहेर जायचे झाल्यास न्यायालयाच्या परवानगीची अट घालण्यात आली होती.
दरम्यान पूनमने वैद्यकीय तपासणी केली असता ती सहा आठवड्याची गरोदर असल्याचे व तिला विश्रांतीची गरज असल्याचा दाखला तिने न्यायालयात सादर केला. तसेच सॅमने आपल्याला मुंबईत एका फिल्मसह डॉक्युमेंटरी शूट करायचे कारण पुढे केले.
न्या. शानुर अवदी यांनी अतिरिक्त हमीच्या अटीवर दोघांना गोवा सोडण्याची मंजुरी दिली. यावेळी पुनम व सॅमच्या वतीने बाजू मांडताना अॅड. बायरन रोड्रिग्स यांनी दोघांचे गोव्यात घर नसल्याने न्यायालयास सांगीतले. दोघांना हॉटेलात रहावे लागत असून संचार स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असल्याचे कथन केले. कुणाविरुद्ध गुन्हा नोंद झाला तरी त्यांचे व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावणे शक्य नसल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला.
पूनमला मिळालेला जामीन रद्द होण्यासाठी तक्रारदार सम्राट भगत यांनी दाखल केलेल्या आव्हान अर्जावरील सुनावणी 21 नोव्हेंबर रोजी होती. त्यामुळे पूनमवर लग्नानंतरची पहिली दिवाळी गोव्यातच साजरी करण्याची वेळ आली होती. काणकोण न्यायालयाच्या परवानगीमुळे त्यांना मुंबईला जाण्याची संधी मिळाली.