जळगाव : बेकायदेशीर चॉपर बाळगत कोणतातरी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या अवघ्या 19 वर्षाच्या तरुणास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकाने आज ताब्यात घेतले आहे.
लोकेश चंद्रकांत दंडगव्हाळ (19) असे ताब्यातील तरुणाचे नाव आहे. एमआयडीसी परिसरातील ट्रांसपोर्ट नगरातील हॉटेल प्रिंस नजीक लोकेश हा आपल्या कब्जात घातक शस्त्र चॉपर बाळगून कोणतातरी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती.
त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकातील पो.हे.कॉ. जयंत चौधरी, पंकज शिंदे, दत्तात्रय बडगुजर, परेश महाजन, सहायक फौजदार रमेश जाधव यांना रवाना केले. पथकाने तात्काळ शिताफीने लोकेश दंडगव्हाळ यास ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी व तपास सुरु आहे.