तिघे मोटार सायकल चोर एलसीबीच्या जाळ्यात

जळगाव : एक वर्षापुर्वी चोरी केलेली मोटार सायकल नंबर प्लेट बदलून वापरणा-या चोरट्यास त्याच्या दोघा साथीदारांसह ताब्यात घेण्यात जळगाव एलसीबीचे पो.नि. किरणकुमार बकाले व त्यांच्या पथकाला यश आले आहे.

गेल्या एक वर्षापुर्वी वरणगाव नजीक तळवेल शिवारातून हिरो अच्युवेअर मोटार सायकल (एमएच- 19 सीएच 4426) चोरी झाली होती. या चोरीबाबत वरणगाव पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.नं. 139/2019 भा.द.वि. 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत झाले होते. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, पो.हे.कॉ.अनिल इंगळे, अनिल देशमुख, रमेश चौधरी, रवी नरवाडे, संतोष मायकल, ईशान तडवी यांच्या पथकाने आदर्श उर्फ गोल्डन तायडे यास भुसावळ येथील डॉ. आंबेडकर नगर येथून ताब्यात घेण्यात आले.

त्याने चौकशीअंती तो वापरत असलेली हिरो अच्युवेअर मोटार सायकल चोरीची असून नंबर प्लेट बदलून वापरत असल्याचे त्याने कबुल केले. सखोल चौकशीअंती त्याने या चोरीच्या गुन्ह्यातील त्याच्या दोघा साथीदारांची नावे उघड केली. या चोरीत त्याचे साथीदार सागर बबन हुसळे (कंडारी – भुसावळ) तसेच अलीम शेख अकील (कंडारी – भुसावळ) यांचा सहभाग असल्याचे त्याने कबुल केले.

एलसीबी पथकाने त्याच्या दोघा साथीदारांना देखील ताब्यात घेत अटक केली. तिघा आरोपींना पुढील तपासकामी वरणगाव पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here