चोरीच्या गुन्ह्यातील दोघे एलसीबी पथकाच्या ताब्यात

जळगाव : पहुर पाळधी व कंडारी ता. भुसावळ येथील दोघा चोरट्यांना एलसीबी पथकाने ताब्यात घेतले असून पुढील तपासकामी त्यांना वरणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

भुसावळ शहर व पहुर पाळधी येथील काही तरुण चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरीसह मोबाईल चोरीचे गुन्हे करत असल्याची माहिती एलसीबीचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती.

प्राप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल नाईक, पोहेकॉ.सुनिल दामोदरे,जयंत चौधरी, प्रदीप पाटील, पंकज शिंदे, परेश महाजन, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील , मुरलीधर बारी आदींचे पथक स्थापन करण्यात आले होते.

या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पहुर पाळधी येथुन मोहीत उर्फ आकाश नरेंद्र जाधव (२२)रा.पहुर पाळधी ता.जामनेर यास चौकशीकामी ताब्यात घेतले. सखोल चौकशीअंती त्याने त्याचा साथीदार सिध्दांत उर्फ सोनु अरुण म्हस्के रा.रेल्वे कॉलनी कंडारी याचे नाव सांगितले.

या दोघा जणांनी वरणगाव येथील राजमल ज्वेलर्स येथे चोरीसह मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले. दोघांना वरणगाव पोलीस स्टेशन येथे दाखल भाग -५ गु.र.न. १७९/२०१९ भा.द.वि. ४५४, ४५७, ३८० या गुन्हयात ताब्यात घेत वरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दोघांना भुसावळ न्यायालयात हजर केले असता तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here