कुरीयरने पिस्तुलसह मॅगझिनची डिलीव्हरी

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा बसस्थानकावर कुरियरने आलेल्या संशयास्पद बॉक्ससह एकाला अकोला एटीएस पथकाने स्थानिक साखरखेर्डा पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. या संशयास्पद बॉक्सची झडती घेतली असता त्यात दोन पिस्तुलांसह मॅगझीन आढळून आले.

गोपाल रामसिंग शिराळे (रा. साखरखेर्डा) यास अटक करण्यात आली असून शनीवारी दुपारी घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. अटकेतील आरोपीची पार्श्वभुमी गुन्हेगारी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. साखरखेर्डा बसस्थानकावर कुरीयरचे पार्सल सोडवून घेवून जात असताना गोपाल रामसिंग शिराळे यास अटक करण्यात आली. एटीएस पथकासह पोलिसांनी त्याला वेळीच अटक केली.

गोपाल शिराळे याने पिस्तुलासह मॅगझीनचा बॉक्स कुठून मागवला? या पिस्तुलचा तो कुठे वापर करणार होता? यापुर्वी त्याने असा बॉक्स मागवला होता का? या बाबी तपासल्या जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here