जळगाव : पो.नि. किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर कामगिरीचा धडाका सुरु केला आहे. त्यांच्या सततच्या कारवायांमुळे गुन्हेगारी कारवायांवर मोठ्या प्रमाणात अंकुश बसल्याचे म्हटले जात आहे. पो.नि. बकाले यांनी आपल्या कारवाईत सातत्य ठेवण्याची अपेक्षा सामान्या नागरिकांकडून होत आहे.
जळगाव – धुळे मार्गावरील वैष्णवी पार्क नजीक पवन नारायण कापसे हा तरुण आपल्या कब्जात बेकायदा चॉपरसह असल्याची गुप्त माहिती पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्यानुसार त्यांनी आपले सहकारी स.फौ.राजेंद्र काशीनाथ पाटील, अशोक महाजन, पो.हे.कॉ.सुधाकर अंभोरे, अनिल देशमुख,अशरफ शेख, दिपक शिंदे, इंद्रीस पठाण यांना तात्काळ त्याठिकाणी रवाना केले.
जळगाव शहरातील वैष्णवी पार्क, मातोश्री शाळेजवळ पवन कापसे यास त्याच्या कब्जातील चॉपरसह शिताफीने ताब्यात घेण्यात पथकाला यश आले. पोलिस पथकाने केलेल्या चौकशीत त्याने हा चॉपर आपण वाढदिवसाचा केक कापण्यासाठी परेश आनंदा गोयर याच्याकडून घेतल्याचे कथन केले. याप्रकरणी पवन कापसे व त्याचा साथीदार परेश गोयर या दोघांना अटक करण्यात आली. दोघांविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियम ४/२५ अन्वये जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.