घरफोडी करणारे तिघे एलसीबीकडून जेरबंद

On: November 22, 2020 5:07 PM

जळगाव : मौजमजा करण्याच्या उद्देशाने काही तरुण जळगाव शहरातील सुरत रेल्वे गेट परीसरात रात्रीच्या वेळी घरफोड्या करत असल्याची माहिती एलसीबीचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती. मिळालेल्या माहीतीनुसार पो.नि.बकाले यांनी तपासकामी पथक तयार केले.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे, स.फौ.विजय पाटील, अशोक महाजन, संजय हिवरकर, राजेश मेढे, रवि नरवाडे, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे, प्रमोद लाडवंजारी, अविनाश देवरे, महेश महाजन, अशोक पाटील यांचा समावेश करण्यात आला होता.

या पथकाने सलग ४८ तास रात्रं-दिवस सुरत रेल्वे गेट परिसरात सापळा लावला होता. त्या सापळ्यात तिघा संशयीतांना यशस्वीरित्या ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या विठठल उर्फ सोन्या अशोक लोंढे (२५), पंकज उर्फ गोलु समुद्रे (२२), मिलींद उर्फ आप्पा भिका व्यहाळे (२८) सर्व राहणार राजमालती नगर, दुध फेडरेशन सुरत रेल्वे गेट जवळ जळगाव यांची सखोल चौकशी करण्यात आली.

३ व ४ नोव्हेंबरच्या दरम्यान मध्यरात्रीच्या वेळी जळगाव शहरातील वाघुळदेनगरात घरफोडी केल्याचे ताब्यातील तिघांनी कबुल केले. या घरफोडीच्या गुन्हयातील चोरी करण्यात आलेले सर्व शैक्षणिक कागदपत्रे, एलसीडी टीव्ही, मोबाईल फोन, बँकेची कागदपत्रे त्यांनी तपासात काढून दिली.

जळगाव शहर पोलीस स्टेशनला भाग ५ गु.र.न.२१०/२० भा.द.वि. ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्हयाच्या तपासकामी तिघांना जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment