कही खुशी-कही गम; बदल्यांचा संपला मौसम

Maharshtra police
Maharashtra police imaginary pic

मार्च महिना उजाडताच बदलीस पात्र असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचा-यांना बदलीचे वेध लागतात. बदलीस पात्र असलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी बदली प्रक्रीयेकडे डोळे लावून  बसतात. कुणाला आहे त्याच ठिकाणी मुदतवाढ हवी असते. कुणाला विनंती बदली करुन घ्यायची असते. कुणाची नियमानुसार रितसर बदली होणार असली तरी आवडीच्या व सोयीच्या जागेवर बदली करुन घ्यायची असते. बदलीची ही चहलपहल आता थंड बस्त्यात गेली असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. कर्मचारी वर्गाच्या बदल्यांचा विषय तर संपलाच आहे.

मार्च महिन्यात कोरोना या विषाणूने थैमान घातले. या विषाणूसोबत पोलिस दल लढत देत असतांना आता जून महिना संपण्याची वेळ आली आहे. या कोरोना मुळेच बदली प्रक्रियेकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.

ज्यां कर्मचा-यांना आहे त्याच ठिकाणी मुदतवाढ हवी होती त्यांना आपसूकच मुदत वाढ मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्यात खुशीचे वातावरण आहे. मात्र ज्या कर्मचा-यांना बदली हवी होती मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बदली प्रक्रीया कोमात गेल्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सुर कायम आहे.

कोरोनामुळे बदली प्रक्रीया कोमात गेली असली तरी ज्या अधिका-यांची विनंती बदलीची मागणी होती आणि आहे निदान त्यांना तरी बदली मिळावी अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही अपेक्षा जळगावसह धुळे, नंदुरबार, नाशिक व अहमदनगर जिल्हयातून होत आहे. कुणाचे आई वडील आजारी असतात, कुणाची मुले शिक्षणासाठी परगावी राहतात त्यांच्या सोयीसाठी तरी आपल्याला सोयीच्या जागेवर विनंती बदली मिळावी अशी अपेक्षा कित्येक अधिकारी व्यक्त करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here