भारती सिंह व तिच्या पतीला जामीन

मुंबई : छोट्या पडद्यावरील कलाकार भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर दोघांचा जामीन किल्ला न्यायालयाने मंजूर केला आहे. कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर दोघे आपल्या घरी गेले.

या दोघांनाही ड्रग्ज प्रकरणी अटक झाली होती. एनसीबीने त्याच्या घरी छापा टाकला होता. या छाप्यात एनसीबीला त्यांच्याकडे 86.5 ग्रॅमपेक्षा अधिक वजनाच गांजा सापडला होता. अटकेनंतर या दोघांची जामिनावर सुटका झाली आहे. अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलरने दिलेल्या माहितीनुसार भारतीच्या घरासह ऑफिसवर एनसीबीने धाड टाकली होती.

या धाडीत एनसीबीच्या चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाने अमली पदार्थ सेवन करत असल्याची कबुली दिली होती. एनसीबीने भारतीला ‘एनपीडीएस’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करत अटक केली होती. आज दोघांना मुंबई किल्ला कोर्ट न्यायालयाने 4 डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली. दोघांनी केलेला जामिन अर्ज न्यायालयाने मंजुर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here