सेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे ईडीचा छापा

On: November 24, 2020 11:16 AM

ठाणे : ठाण्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचे पथक पोहोचले आहे. मनी लाँड्रिंगच्या संशयावरुन सरनाईक यांच्याकडे हे पथक गेले आहे.

ईडीला प्रताप सरनाईक यांच्यावर मनी लॉंड्रींगचा संशय आहे. ठाण्यात दहा ठिकाणी ईडीच्या पथकाकडून पाहणी सुरु आहे. प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीचे पथक दाखल झाले आहे. सरनाईक यांच्यासह शिवसेनेचे इतर काही नेते देखील ईडीच्या निशान्यावर असल्याचे म्हटले जात आहे.

प्रताप सरनाईक हे ठाणे येथील ओव्हळा-माजीवाडा विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. मीरा-भाईंदर परिसर शिवसेनेचे ते राज्य प्रवक्ते आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment