प्रताप सरनाईक यांचा मुलगा ईडीच्या ताब्यात

ठाणे : प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यास ईडीकडून ताब्यात घेण्यात आले आहे. ईडीच्या पथकाने आज सकाळी सरनाईक यांच्या घरी छापा टाकला. घरातील सदस्यांची प्राथमिक चौकशी सुरुवतीला करण्यात आली. आमदार सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांस चौकशीकामी ईडीने ताब्यात घेतले आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने आज सकाळीच प्रताप सरनाईक यांच्याकडे छापेमारी सुरु केली. ठाण्यात दहा ठिकाणी ईडीच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांची दोन्ही मुले विहंग आणि पुर्वेश यांच्यासह आमदार सरनाईक यांच्या व्यावसायिक कार्यालयावर देखील ईडीने छापा घातला आहे.

या धाडीच्या पार्श्वभुमीवर खासदार संजय राऊत म्हणाले की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही नोटीस पाठवा, कितीही धाडी टाका मात्र विजय हा सत्याचाच होत असतो. आम्ही कुणालाही शरण जाणार नसून लढत राहू असे राऊत यांनी भाजपाला ठणकावून म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here