जळगाव : भडगाव – कजगाव नजीक असलेल्या पासर्डी गावाजवळ दि. २४ मंगळवारच्या पहाटे वळण रस्त्यावर पहुर (जामनेर) येथील मयुर ललित लोढा यांची कार नाल्यात गेली.
या घटनेत मयुर लोढा (२७) व त्यांची पत्नी प्रियंका लोढा (२५) असे दोघे जखमी झाले आहेत. दोघा जखमींना सुरुवातीला पाचोरा येथील रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मयुर लोढा यांची पत्नी प्रियंका यांच्या मेंदूला मार बसला. त्यामुळे त्यांना पुढील वैद्यकीय उपचारार्थ मुंबईला नेण्यात आले आहे.
जखमींना रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या मदतीने नाल्यातून बाहेर काढण्यात आले. जळगाव-चांदवड रस्त्याचे काम पुर्ण होत आले आहे. मात्र वळण रस्त्यावरील काम रखडलेले आहे. हे वळणावरील काम धोकादायक ठरत आहे.