जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमधे घरफोडीसह गांजा बाळगणा-या फरार आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पहिल्या कारवाईत अट्टल घरफोडी व मोटार सायकल चोरी करणारा सुटकार ता. चोपडा येथील प्रविण लोटन कोळी यास अटक करण्यात आली आहे. प्रविण कोळी याच्या ताब्यातून रामानंद नगर तसेच चोपडा शहर पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. चोरीच्या गुन्ह्याच्या तपासकामी त्याला रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. रविंद्र गिरासे, सहायक फौजदार विजय पाटील, अशोक महाजन, सुरज पाटील, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, महेश महाजन यांनी सहभाग घेतला.
दुस-या कारवाईत एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे एनडीपीएस अॅक्ट नुसार दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी रामचंद्र रामदास पावरा यास अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आरोपी शेख युसूफ शेख मुसा याने त्याच्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर कारमधे (एमएच 12 केएन 5169) मधे तीन गोण्यांमधे 1,69,290 रुपये किमतीचा 33.858 किलो वजनाचा गांजा मिळून आला होता. या गुन्ह्यातील फरार रामचंद्र पावरा यास शिरपुर तालुक्यातील महादेव या गावातून शिताफीने अटक करण्यात आली आहे. त्याला पुढील तपासकामी एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत हे.कॉ. संदीप पाटील, प्रविण मांडोळे यांनी सहभाग घेतला.