हॉटेल मालकास मारहाण प्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

On: November 24, 2020 8:47 PM

जळगाव : दर महिन्याला ठराविक हप्ता मिळण्यासाठी हॉटेल मालकास पाच ते सहा जणांनी मारहाण करत हॉटेलची तोडफोड केल्याची घटना पाळधी येथील हॉटेल साईनाथ येथे घडली होती. 19 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटने प्रकरणी आज धरणगाव पोलिस स्टेशनला हॉटेल मालक किरण त्रंबक नन्नवरे यांच्या फिर्यादीनुसार सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील हॉटेल मालक पाळधी खुर्द येथील रहिवासी असून त्यांचे पाळधी येथे हॉटेल आहे. 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी राहुल सपकाळे हा बांभोरी येथील तरुण त्याच्या साथीदारांसह जेवण करण्यासाठी आला होता. जेवण आटोपल्यानंतर त्याने बिल दिले नाही उलट हॉटेल मालकास वाद घालून मारहाण केली होती.

राहुलसोबत आलेले त्याचे साथीदार पद्माकर नन्नवरे, सोपान नन्नवरे, संदीप नन्नवरे, रुस्तम नन्नवरे व राजु सपकाळे यांनी मिळून दरमहा दहा हजार रुपयांचा हफ्ता मिळण्याची मागणी केली होती. यावेळी झालेल्या मारहाणीत हॉटेल मालक किरण नन्नवरे जखमी झाले. उपचार झाल्यानंतर त्यांनी आज धरणगाव पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राहुल सपकाळे, पद्माकर नन्नवरे, सोपान नन्नवरे, संदीप नन्नवरे, रुस्तम नन्नवरे व राजु सपकाळे (बांभोरी) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप संशयीतांना अटक करण्यात आलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment