मेष : कायदेशीर प्रकरणात प्रगती, सामाजिक क्षेत्रात प्रशंसनीय कामगीरी होईल.
वृषभ : अति गोड पदार्थांचे सेवन टाळणे योग्य राहील. उत्साहात दिवस जाईल.
मिथुन : सावधगिरी बाळगून व्यवहार करावे लागतील. वादविवाद टाळावे लागतील.
कर्क : चर्चेतून यश आणि योग्य तो मार्ग सापडेल. नविन करार पुर्ण होतील.
सिंह : निर्णय घेतांना घाई करुन चालणार नाही. भाग्याची योग्य साथ लाभेल.
कन्या : उद्भवलेल्या एखाद्या समस्येचे निराकरण होईल. कर्जाचे व्यवहार तुर्त टाळावे.
तुळ : फसगत होण्यापासून सावधगिरी बाळगावी. चांगल्या वर्तणूकीचा इतरांवर प्रभाव पडेल.
वृश्चिक : नातेसंबंध जपावे लागतील. कौटूंबिक वातावरण उत्साही राहील.
धनु : कलागुण सिद्ध करण्याची संधी मिळेल. दिवसाचा उत्तरार्ध समाधानकारक राहील.
मकर : नोकरीत कामाच्या गुणवत्तेत तडजोड करु नका. मानसिक समाधान लाभेल.
कुंभ : शब्द जपून वापरणे योग्य राहील. एखादी आनंदाची बातमी समजण्याची शक्यता आहे.
मीन : जुन्या ओळखींना उजाळा मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.