जळगाव : गरबा पाहण्यासाठी गेलेल्या दोघा जणांना काही इसमांकडून लोखंडी रॉडसह काठ्यांनी मारहाण करण्यात आली होती.सदर घटना 25 ऑक्टोबर रोजी नाथवाडा सिंधी कॉलनी भागात रात्रीच्या वेळी घडली होती.
या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या माहीतीनुसार या गुन्हयातील आरोपी हिरामण एकनाथ जोशी यास पथकाच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. याकामी पो.हे.कॉ.शरद भालेराव, कमलाकर बागुल , रामकृष्ण पाटील यांनी सहभाग घेतला.