मुंबई : टॉप ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आ. प्रताप सरनाईक यांचे जवळचे मित्र असलेले अमित चंडोले यांना अटक झाली आहे. याप्रकरणी ही पहिलीच अटक आहे. बारा तासांच्या चौकशीनंतर चंडोले यांच्या अटकेची कारवाई करण्यात आली. प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंगला चौकशीकामी हजर राहण्याचे आदेशही ईडीकडून देण्यात आले आहे.
मुंबईतल्या सुरक्षा रक्षकांचे कंत्राट एमएमआरडीएला दिले होते. याचे सब कंत्राट चंडोले याच्या टॉप गृपच्या खासगी सुरक्षा कंपनीला मिळाले होते. यातील 175 कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी सदर कारवाई झाली आहे.
मंगळवारी ठाणे येथे झालेल्या छापेमारीत मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे चंडोले कनेक्शन उघड़ झाले होते. त्यानुसार बुधवारी चंडोले यांची सलग बारा तास चौकशी झाली. त्यानंतर त्यांच्या अटकेची कारवाई झाली.