“ले जाओ जी भाडे से” – “जे.व्ही.चॉईस”चे नवे दालन

जळगाव : जळगाव शहराच्या गोलानी मार्केटमधे नव्याने स्थापन झालेल्या “जे.व्ही.चॉईस” या प्रतिष्ठानचे “ले जाओ जी भाडेसे” ही स्लोगन सध्या चर्चेचा विषय झाली आहे. युवा वर्ग विशेषत: लग्न ठरलेल्या वरासह नातेवाईकांची पावले “जे.व्ही.चॉईस” या प्रतिष्ठानाकडे वळत आहे.

नुकतीच दिवाळी आटोपली असून आता लग्नसराईची धामधूम सुरु झाली आहे. लग्नकार्य म्हटले म्हणजे नवरदेवाच्या शिरपेचातील फेट्यापासून पायातील मोजडीपर्यंतची तयारी करावी लागते. या सर्व गरजा ओळखून “जे.व्ही. चॉईस” ची निर्मीती करण्यात आली आहे. नवरदेवास लागणारे कोट, ब्लेझर, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न असे विविध वस्त्रप्रावरणे याठिकाणी एकाच छताखाली मिळतात व ती देखील चक्क भाड्याने.

मयुर चौधरी

कोट, ब्लेझर, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न असे विविध प्रकारचे कपडे रेडीमेड घेण्यास दुकानात गेल्यावर अथवा शिवण्यासाठी टेलरकडे गेल्यावर बजेटचा आकडा बघून वा ऐकून मध्यमवर्गीयांचे डोळे विस्फारतात. त्यातल्या त्यात तरुणाईला असे विविध वस्त्र परिधान करण्याची हौस मनात निर्माण झाल्याशिवाय रहात नाही. हौस पुर्ण झाली पाहिजे आणि बजेट देखील आवाक्यात राहीले पाहिजे हा सर्वसामान्य लोकांच्या मनातील विचार जे.व्ही.चॉईसचे युवा संचालक मयुर विजय चौधरी यांनी ओळखला.

असले महागडे कपडे लग्नाच्या वेळी खरेदी केल्यानंतर अथवा शिवून घेतल्यानंतर ते कपाटाचे धन होत असते, अर्थात त्याचा वापर दुर्मीळ होतो. त्यामुळे या कपड्यात केलेली गुंतवणूक एकप्रकारे “डेड इन्व्हेस्टमेंट” असते.

त्यामुळे “भाड्याने घ्या-वापरा-हस्तांतरण करा” हा फंडा पुढे आला आहे. सर्वसामान्य तथा मध्यमवर्गीयांच्या मनातील आवड आणि हौस अचुकपणे हेरण्याची कला आणि कसब या दालनाचे युवा संचालक मयुर चौधरी यांच्या अंगी आहे.

ब्लेझर, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न अथवा कोट हे वस्त्र विकत अथवा शिवून घेण्यासाठी जवळपास किमान दहा हजार रुपयाहून अधिकचा खर्च येत असतो. शिवाय लग्नकार्य झाल्यानंतर याचा वापर जवळपास दुर्मीळ होतो. त्यामुळे हौस झाली पाहिजे, व्हरायटी मिळाली पाहिजे आणि खर्च देखील मोजका लागला पाहिजे, कामही भागले पाहिजे असे सर्व हेतू “जे. व्ही. चॉईस” च्या माध्यमातून पुर्ण होत आहेत.

“जे.व्ही. चॉईस” गोलानी मार्केट जळगाव या प्रतिष्ठानचे युवा संचालक मयुर चौधरी यांनी सुरुवातीचे शिक्षण भुसावळ येथील बियानी मिलीटरी स्कुल येथे पुर्ण केले. त्यानंतर नाशिक येथून बी.ई. (ई अ‍ॅण्ड टी.सी.) चे शिक्षण पुर्ण केले. त्यांचे पिताश्री विजय चौधरी यांची टेलरींग व्यवसायात सुमारे 35 वर्षाची तपश्चर्या आहे. वडीलांच्या पारंपारिक टेलरींग व्यवसायात पाऊल न टाकता काहीतरी “हटके” करण्याचा विचार मयुर चौधरी यांनी केला आणि तो अमलात देखील आणला. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांना महाविद्यालयात आलेल्या कॅंम्पसच्या माध्यमातून चांगल्या पगाराचा जॉब देखील मिळाला. मात्र व्यवसाय करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातल्या त्यात पारंपारिक टेलरींग व्यवसाय न करता काहीतरी वेगळेपण असलेला व्यवसाय करण्याचे विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते.

रेडीमेड शेरवानी अथवा कोट शिवणारे अथवा विकणारे बरेच जण असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र या वस्त्रांमधे मध्यमवर्गीयांची धनराशी मोठ्या प्रमाणात अडकून पडत असल्याचे त्यांनी हेरले. काही दिवस हे वस्त्र वापरल्यानंतर त्याचा फारसा वापर देखील होत नाही. हाच धागा हेरुन हे वस्त्र भाड्याने देण्याची कल्पना त्यांना सुचली. जळगावसह नजीकच्या नाशिक जिल्ह्यात देखील अशी संकल्पना अद्याप रुजलेली नाही.

लग्नकार्यात सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांसह आता हायफाय वर्गातील लोक देखील या रेंटल बेस कपड्यांची मागणी करत आहेत. प्रत्येक इव्हेंटला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे व ते देखील फिटींगमधे परफेक्ट आणि वाजवी भाड्यात आणि वेळेवर मिळत असतील तर का जावू नये “जे.व्ही. चॉईस” मधे असा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही. या ठिकाणी शेरवानी, कोट पॅंट, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पायजमा, मोदी जॅकेट, फेटा, मोजडी यासह इतर अ‍ॅसेसरीज मिळतात.

भविष्यात नववधूसाठी लागणारे लेंगा, वन पिस गाऊन, ज्वेलरी आदींची भाड्याने मिळण्याची सुवीधा सुरु करण्याचा मयुर चौधरी यांचा मानस आहे. तो मानस लवकरच अमलात देखील येणार असल्याचे मयुर चौधरी यांनी म्हटले आहे. याशिवाय प्रिवेडींग कपल ड्रेसेस देखील मिळणार आहेत. तर मग……… या लग्नाच्या सिझनमधे जे.व्ही.चॉईस ला भेट देणार की नाही?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here