मुंबईच्या चौघा पोलिसांना राजस्थानात अटक – दोन लाखाची लाच भोवली

On: November 26, 2020 12:30 PM

जयपूर : राजस्थानच्या जयपूर शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई पोलिसांवर कारवाई केली आहे. दोन लाख रुपयांची लाच घेताना मुंबईच्या चौघा पोलिसांना अटक करण्यात आली असून त्यात एक अधिकारी आहे.

अटकेतील एक पोलिस उप निरिक्षक व तिघे कर्मचारी असे चौघे बोरीवली पोलिस स्टेशनला सेवारत आहेत. एका प्रकरणातील आरोपीच्या शोधार्थ चौघे जण जयपूरला आले होते. यावेळी चौघांना लाच घेताना अटक झाली.

दोन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राजस्थान एसीबी पथकाने चौघांना बुधवारी अटक केली आहे. पीएसआय प्रशांत शिंदे, कॉन्स्टेबल लक्ष्मण, सुभाष पांडुरंग आणि सचिन गुडके अशी अटकेतील चौघांची नावे आहेत.

मुंबईतील कापड व्यावसायीक विनोद हा बोरिवलीत भाडे तत्वावर दुकान चालवतो. याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पीएसआय शिंदे व त्यांचे पथक जयपूरला विनोदच्या अटकेसाठी गेले. त्यावेळी त्याच्या वडिलांना देखील अटक करण्याचे त्यांनी धमकावले. याशिवाय त्यांच्याकडून दोन लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्या आरोपानुसार त्यांच्या घर मालकाने जयपूर एसीबीकडे तक्रार दाखल केली. एसीबीने रचलेल्या सापळ्यात पीएसआय शिंदे व त्यांचे सहकारी रंगेहाथ पकडले गेले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment