डीआयजी पथकाचा एरंडोल येथे जुगार अड्ड्यावर छापा

On: November 26, 2020 2:34 PM

जळगाव : नाशिक पोलीस महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील जुगार अड्ड्यावर आज गुरुवारी भल्या पहाटे धाड टाकली. या धाडीत एकुन दहा जणांना अटक करण्यात आली आहे.

पकडण्यात आलेल्या दहा जणांच्या ताब्यातून एक लाख रुपये रोख, दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. भल्या पहाटे दोन वाजेच्या सुमारास एरंडोल शहरानजीक असलेल्या एका लिंबूच्या बागेत या कारवाईचे सत्र पार पडले.

अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत. स्वप्नील मुरलीधर पाटील, मच्छिंद्र नारायण महाजन, सुनील नाना पाटील, रफीक खान याकूब खान, पंढरी खुशाल पाटील, शांताराम राजाराम महाजन, अमित लक्ष्मण परदेशी, गुलाब महादू पाटील, सिद्धार्थ हिम्मत सिंग परदेशी, राजेश मोतीराम पाटील. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांच्या फिर्यादीनुसार एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment