गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसासह आरोपी बाजारपेठे पोलिसांच्या ताब्यात

On: June 26, 2020 7:41 PM

जळगाव: भुसावळ शहरातील जामनेर रस्त्यावरील साईबाबा मंदीराजवळ एजाज उर्फ सोन्या खान अयुब खान (रा. जाम मोहल्ल्या  भुसावळ) हा आपल्या कब्जात बेकायदा गावठी कट्टा बाळगत फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

पो.नि. दिलीप भागवत यांना या प्रकरणी गुप्त माहिती मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे,पो.ना.किशोर महाजन, रमण सुरळकर, रविंद्र बिऱ्हाडे, तुषार पाटील, दीपक पाटील, पो.कॉ.विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, कृष्णा देशमुख,सुनील सांळूखे यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्या ताब्यातून 15000 रुपये किमतीचा गावठी कट्टा व जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले.  त्याच्याविरुद्ध आर्म अ‍ॅक्ट नुसार कारवाई करण्यात आली.

गावठी कट्टा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment