‘ईडी’ पथकांकडून नाशीकला झाडाझडती?

नाशिक : आर्थिक घोटाळ्यासह गैरव्यवहाराच्या संशयातून नाशिकात ईडीची पथके गेल्या दोन दिवसापासून तळ ठोकून होती अशी चर्चा सुरु आहे. ईडीच्या पथकाने नाशिक शहरातील काही सहकारी पतसंस्थांसह खासगी व्यक्तींची चौकशी केल्याचे देखील म्हटले जात आहे.

शहरासह जिल्ह्यातील एकुण चार संस्थांचा या चौकशीत समावेश असल्याची चर्चा नाशिक शहरासह परिसरात सुरु आहे. तीनशे कोटी रुपयांच्या केबीसीच्या आर्थिक घोटाळ्याबाबत देखील ईडीने पोलिसांकडून माहिती घेतल्याचे समजते.

ईडीच्या या चौकशीबाबत अधिकृतरित्या माहिती देण्यात आली नसली तरी या चौकशीची चर्चा मात्र पसरली आहे. नाशिक शहरासह सिन्नर तालुक्यातील खासगी सहकारी संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी या पथकाने चौकशी केल्याचे म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here