जळगाव : जळगाव शहरातील बीएचआर मल्टीस्टेट पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या शिवाजी नगर भागातील निवासस्थानी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकल्याने खळबळ माजली आहे.
दरम्यान कंडारे घरी हजर नसल्याची माहिती पुढे आली आहे. पथकाने केलेल्या तपासणीचा तपशील समजू शकला नाही. भाईचंद हिराचंद रायसोनी या अवसायानात असलेल्या पतसंस्थेच्या अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या साशंक कारभाराच्या विरोधात १९ जुलै २०१९ रोजी महाराष्ट्र व्यापी आंदोलन करण्यात आले होते. जितेंद्र कंडारे यांच्या कार्यपद्धतीबद्दल ठेवीदारांनी साशंकता व्यक्त केली होती.