जळगावात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाचे छापे


जळगाव : जळगाव शहरातील बीएचआर मल्टी-स्टेट को ऑपरेटीव्ह पतसंस्थेच्या एमआयडीसी येथील मुख्य कार्यालयासह विविध ठिकाणी छापे टाकण्यात आली आहे. या छाप्यात नेमका काय प्रकार उघडकीस आला याचा तपशील बाहेर आलेला नाही

बीएचआर मल्टीस्टेट को ऑप. पतसंस्थेकडून झालेल्या अपहार व फसवणूक प्रकरणी हे धाडसत्र सुरु आहे. पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या अखत्यारीत 136 जणांचे पथक आज सकाळपासून या कारवाईत गुंतले आहे.

ज्या हद्दीत चौकशी सुरु आहे त्या त्या हद्दीतील पोलिस स्टेशनच्या कर्मचा-यांचा खडा पहारा देण्यात आला आहे. या धाडसत्रामुळे शहरात खळबळ माजली आहे. यात प्रामुख्याने बीएचआरचे एमआयडीसी येथील मुख्य कार्यालय, अवसायक कंडारे यांचे शिवाजी नगर भागातील निवासस्थान तसेच इतर शाखांमधे या पथकाने धाडी टाकून चौकशी सुरु केली आहे.

भल्या पहाटेपासून पथकातील अधिका-यांनी संबंधीतांकडे कागदपत्रांची माहिती घेत पंचनामा करण्याचे काम सुरु आहे. या कारवाईतून बडे बडे मासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात असून नेमका काय तपशील समोर येतो याकडे संबंधितांचे लक्ष लागून आहे. तसेच ज्या ज्या ठेवीदारांची फसवणूक झाली आहे त्यांना न्याय मिळेल काय? याकडे देखील संबंधित ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here