इंदोरीकर महाराजांविरोधात अखेर गुन्हा दाखल

On: June 26, 2020 7:42 PM

संगमनेर: समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज अर्थात निवृत्ती महाराज देशमुख यांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भास्कर भवर यांनी फिर्याद दाखल केली असल्याची माहिती बुवाबाजी संघर्ष समितीच्या सचिव रंजना गवांदे यांनी दिली आहे. 

निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी आपल्या किर्तनात स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो. विषम तिथीला झाला तर मुलगी होते. स्त्री संग जर अशुभ वेळेला झाला तर संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळविणारी होते, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याविरोधात संगमनेर न्यायालयात फिर्याद दाखल झाली आहे.

जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून संगमनेर न्यायालयात पीसीपीएनडीटी अ‍ॅक्टनुसार फिर्याद दाखल करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.भास्कर भवर यांनी ही फिर्याद दाखल केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment