जळगाव : औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद व सिल्लोड येथून चोरी गेलेल्या दुचाकींचा शोध जळगाव एलसीबी पथकाने आज लावला. जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील दोघा तरुणांना चोरीच्या चार दुचाकींसह ताब्यात घेण्यात आले आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईतील चारही दुचाकी संबंधीत पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.
कल्पेश रविंद्र पाटील व शिवाजी करतारसिंग परदेशी अशी अटकेतील दोघा तरुणांची नावे आहेत. दोघा तरुणांनी औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद व सिल्लोड येथील दुचाकी चोरण्याची करामत केली होती.
कल्पेश रविंद्र पाटील याने खुलताबाद पोलिस स्टेशन हद्दीतून हिरो होंडा शाईन (एमएच 20 एफजे 6624) आणि सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतून होंड युनिकॉर्न (एमएच 20 एफडी 8521) अशा दोन दुचाकी चोरल्या होत्या.
शिवाजी करतारसिंग परदेशी याने खुलताबाद पोलिस स्टेशन हद्दीतून होंडा शाईन (एमएच 20 एफएम 6950) तर खुलताबाद पोलिस स्टेशन हद्दीतून रॉयल एनफिल्ड (एमएच 20 एफआर 9274) अशा दोन दुचाकी चोरल्या होत्या.
चारही दुचाकी संबंधीत पोलिस स्टेशनकडे देण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, पो.हे.कॉ. शरीफोद्दीन काझी, युनुस शेख, किशोर राठोड, विनोद सुभाष पाटील, रणजित जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला.