गवंडी काम करणारा घरफोड्या एलसीबीकडून जेरबंद

जळगाव : दिवसा गवंडीकाम करुन रात्री घरफोडी करण्याचे काम करणा-या तरुणास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्य पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे.12 ऑक्टोबरच्या मध्यरात्री कासोदा या गावी दिनेश साळुंखे यांच्याकडे घरफोडीचा प्रकार झाला होता. या प्रकरणी कासोदा पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.नं. 101/20 भा.द.वि. 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान वनकोठा तालुका एरंडोल येथील एक तरुण दिवसा गवंडी काम करुन रात्री चो-या, घरफोड्या करत असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना समजली. त्या माहितीच्या आधारे तपासकामी पो.नि. बकाले यांनी पोलीस उपनिरीक्षक रविद्र गिरासे, स.फौ.विजय पाटील, नरेंद्र वारुळे,जयंत चौधरी , कमलाकर बागुल, विजय शामराव पाटील, भगवान पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, पो.हे.कॉ.राजेंद्र पवार यांचे एक पथक तयार केले. या पथकास त्यांनी पुढील तपासकामी रवाना केले.

अजस हिरालाल मोहीते (19) रा.वनकोठे तालुका एरंडोल या तरुणास संशयाच्या बळावर ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. कासोदा येथील दिनेश दिलीप सांळुखे रा.जेडीसीसी बँकेजवळ, सोनार गल्ली, कासोदा यांच्या घरात घरफोडी केल्याचे त्याने कबुल केले. पुढील तपासकामी त्याला कासोदा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here