गेल्या काही महिन्यापासून सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात सोने 4 हजार रुपयांनी घसरले. ऑगस्ट महिन्यापासून सोने आठ हजार रुपयांनी घसरले. आता सोन्याच्या दराबाबत भारतीय बाजारपेठेत चांगले संकेत मिळत असल्याचे दिसून येत आहे. सन 2020 संपण्यासाठी आता शेवटचा महिना शिल्लक राहीला आहे. पुढील दोन महिन्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात सोन्याच्या किंमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सन 2021 च्या सुरुवातीला सोन्याचे दर 42,000 प्रति ग्रॅम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामागील काही कारणे आहेत.
भारतात ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यात सण होते. या सणामुळे सोन्याच्या किमती वाढतील असा एक अंदाज वर्तवला जात होता. मात्र कोरोना आणी लॉकडाऊन मुळे आर्थिक व्यवस्था कोलमडली. त्यामुळे सोने खरेदीदारांनी बाजाराकडे पाठ फिरवली. या पार्श्वभुमीवर सोने स्वस्त झाले. नोव्हेंबर महिन्यापासून सोने जवळपास 2600 रुपयांनी कमी झाले. अधिकतम स्तरावरुन सोन्याचे दर चार हजार रुपयांनी कमी झाले.
ऑगस्ट महिन्यात सोने 56 हजार रुपयांच्या जवळपास गेले होते. त्यावेळी सोन्याचे दर अजून वाढतील असे म्हटले जात होते. आता यापुढे कोरोना लस येण्याची शक्यता गृहीत धरली जात आहे. त्यामुळे सोन्याचे दर अजुन कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुंतवणूकदार आता सोन्यातून पैसा काढून घेत असल्याचे दिसून येत आहे.
आता कोरोना लस बनवण्याची तयारी सुरु झाली असून ती लस लोकांपर्यंत पोहोचण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात त्या प्रमाणात घसरण दिसणार आहे. तज्ज्ञांच्या मते फेब्रुवारी 2021 पर्यंत सोन्याचे दर हे 42 हजार रुपये प्रति दहा ग्रॅमवर जावू शकतात.