मुंबई : व्हॉटसअॅप आपल्या ग्राहकांसाठी लवकरच एक नवीन फिचर आणण्याच्या बेतात आहे. या फिचरचा वापरकर्त्यांना फायदा होणार आहे. चॅटिंग अॅपवर मित्र अथवा जवळच्या व्यक्तींसोबत आपण एखादी गोष्ट शेअर करतो. मात्र कुणी आपला मोबाईल मागितल्यावर आपली अडचण निर्माण होते.
आपले वैयक्तिक चॅट ती व्यक्ती वाचणार तर नाही याची आपल्या मनात भिती असते. व्हॉटस वेब उघडे असतांना जवळपास कुणी असेल तर आपले वैयक्तीक चॅट कुणी वाचण्याची देखील भिती आपल्याला असते. त्यामुळे आपले वैयक्तीक चॅट लपवण्याची एक सोपी पद्धत असुन त्यानुसार आपण आपले वैयक्तीक चॅट लपवू शकतो. अजून हे फिचर आलेले नाही.
व्हाट्सअॅपचे ‘Archive’ हे फिचर यासाठी वापरावे लागणार आहे. या फिचरचय सहाय्याने आपण आपले चॅट्स अथवा गृप चॅट लपवू शकतो. गरज असेल तेव्हा आपण ते Unarchive देखील करु शकतो.
प्रथम आपण व्हॉटस अॅप उघडावे. त्यानंतर त्यानंतर चॅट्स सेक्शनमधे जावे. चॅट सेक्शनमधील जे चॅट लपवायचे आहे ते थोडा वेळ दाबून धरावे. त्यानंतर टॉप बारवरुन ‘Archive icon सिलेक्ट करावे लागेल. असे केल्यामुळे संबंधीत चॅट्स Archive होतील आणि ते चॅट स्क्रीनवर अदृश्य होतील.
अँड्रॉइड फोनरील चॅट Unarchive करण्यासाठी प्रथम WhatsApp उघडा. खाली जाण्यासाठी स्क्रोल करावे. त्यानंतर Archived Chats वर क्लिक करावे लागेल. ज्या चॅट्सला unarchive करायचे आहे त्या चॅटवर क्लिक करावे.
वेबवर पुढील रितीने चॅट्स लपवावे लागेल. WhatsApp Web वर सर्व चॅट्स स्क्रिनच्या डाव्या बाजूला असतात. जे चॅट्स आपणास लपवायचे आहे त्या चॅटवर अॅरो क्लिक करुन ते सिलेक्ट करा. त्याच चॅटवर उजव्या बाजूला आपणास ‘v’ चिन्ह दिसेल. त्यानंतर ड्रॉपविंडोवर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर आपणास ‘Archive chat’असे समोर दिसेल. असे केल्यामुळे तुमचे chat Archive होईल व स्क्रीनवरील चॅट कुणाला दिसणार नाही.
सर्च बारच्या शेजारील तीन टिंबांवर क्लिक केल्यानंतर Archived पर्याय आपणास दिसेल. त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर Archive केलेली सगळी चॅट्स आपणास दिसतील. त्यावर पुन्हा क्लिक केल्यास ती Unarchive होतील.