जळगाव : अवैध वाळू वाहतुकीला प्रतिबंध करण्याकामी महसुलची यंत्रणा कामाला जुंपलेली असते. जिल्हाधिकारी आपल्या यंत्रणेला वेळोवेळी अवैध वाळू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी निर्देश देत असतात. मात्र काही तलाठी या अवैध व्यवसायीकांशी हातमिळवणी करत असल्याचे देखील उघड होत असते.
रविंद्र घुले नामक तलाठी महोदयांनी (आप्पा) काल 1 डिसेंबर रोजी अवैध वाळू वाहतुक करणारे वाहन सोडून दिले. वाळू वाहतुक प्रतिबंध करण्याकामी नियुक्त करण्यात आलेल्या पथकात रविंद्र घुले नामक तलाठी आप्पा हेच एकमेव वरिष्ठ असतांना त्यांनी अवैध वाळूची वाहतुक करणारे एक वाहन सोडून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी या तलाठी आप्पांना खडसावून हे वाहन का सोडले याचा जाब विचारल्याबाबतचा एक ऑडीओ व्हायरल झाला आहे.
या ऑडीओच्या माध्यमातून तलाठी आप्पांची पाचावर धारण बसल्याचे दिसून येते. आपण नवीन असल्यामुळे व आपल्याला काही समजले नाही म्हणून आपण ते वाहन सोडून दिल्याचे आप्पा म्हणत आहे.
ऐका तो ऑडीओ.