जळगाव : एकनाथराव खडसे अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमीटेड ही पतसंस्था वरणगाव ता. भुसावळ येथे असून या संस्थेचे संस्थापक चेअरमन सुधीर कोल्हे आहेत.
5 डिसेंबर रोजी माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी या पतसंस्थेच्या दोघा ठेवीदारांना प्रसारमाध्यमांसमोर आणून माहिती दिली. या दोघा ठेवीदारांच्या काही ठेवी या पतसंस्थेत अडकून पडलेल्या आहेत. आपल्या ठेवीची रितसर रक्कम परत मिळावी अशी या दोघा ठेवीदारांची मागणी आहे. या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभुमीवर एकनाथराव खडसे पतसंस्थेच्या वतीने एक प्रसिद्धीपत्रक देण्यात आले आहे. या पत्रकात विद्यमान चेअरमन कोण आहेत याचा खुलासा होत नसून विशेष वसुली अधिकारी म्हणून पी.एन. जोहरे यांची सही आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च 2020 अखेर ऑडीट रिपोर्ट नुसार संस्थेच्या ठेवींची रक्कम 9506000 रुपये, राखीव निधी 1400000 रुपये व इतर देणे 4719000 अशी माहिती देण्यात आली आहे. संस्थेचे एकुण येणे कर्ज 7800000 रुपये, गुंतवणूक 2836000 रुपये व इतर येणे 4300000 रुपये तसेच सभासद संख्या 630 असल्याची माहिती देण्यात आली आहे.