सलमा आगा यांच्या मुलीला बलात्काराची धमकी – तरुणीस अटक

On: December 6, 2020 4:01 PM

दिल के अरमां आसुओं में बह गए…… या गीत गायनाने रसिक प्रेक्षकांच्या मनात आगळे वेगळे स्थान निर्माण करणारी गायीका व अभिनेत्री सलमा आगा यांची मुलगी जारा खान सध्या चर्चेत आली आहे.

दिलखेचक अदा आणि सुरेल आवाजाची देणगी लाभलेल्या सलमा आगा यांची मुलगी जारा खान हिने मुंबईच्या ओशिवरा पोलिस स्टेशनला आपल्याला इन्स्टाग्रामवर बलात्काराची धमकी मिळाल्याबाबत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी तेवीस वर्षाच्या एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. सलमा आगा यांनी 80 चे दशक गाजवले आहे.

जाराला बलात्काराची धमकी देणारा तरुण नसून हैदराबाद येथील तरुणी आहे. नुरा सरवर असे त्या तरुणीचे नाव आहे. नुरा सरवर हिने इन्स्टाग्रामवर बनावट प्रोफाईल तयार केले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment